आरमोरीतील काँग्रेसमधील बंडखोर चार उमेदवारांचे अखेर १० नोव्हेंबरला सहा वर्षांसाठी निलंबन करण्यात आले. मात्र, या यादीत काँग्रेस आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष हनमंतू मडावी व काँग्रेस महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्षा नीता तलांडी यांचा समावेश नाही, त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
माजी आमदार आनंदराव गेडाम, डॉ. शिलू चिमूरकर, डॉ. सोनल कोवे, भरत येरमे यांचा निलंबित केलेल्यांमध्ये समावेश आहे. गेडाम व डॉ. चिमूरकर हे आरमोरीत इच्छुक होते, पण दोघांनाही डावलण्यात आले. त्यामुळे त्यांनी पक्षादेश झुगारून अपक्ष नामांकन दाखल केले. गडचिरोलीत डॉ. सोनल कोवे यांनी बंडखोरी करून अपक्ष मैदानात उतरल्या, तर भरत येरमे यांनी वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मिळवली. या सर्वांवर पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले. तथापि, अहेरीत काँग्रेसने जागा
आपल्या वाट्याला यावी यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले; पण आघाडीत ही जागा राष्ट्रवादीकडे (शरद पवार गट) गेली. यामुळे नाराज झालेले आदिवासी काँग्रेस जिल्हाध्यक्ष हनमंतू मडावी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. माजी आमदार पेंटारामा तलांडी यांच्या कन्या व काँग्रेस महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्षा नीता तलांडी या जनशक्ती पक्षाकडून रणांगणात आहेत. आई सगुणा व वडील पेंटारामा यांनीही लेकीची पाठराखण केली असून, ते प्रचारात उतरले आहेत.
आरमोरी, 9 नोव्हेंबर विधानसभा निवडणुकीतील लढतीचे चित्र हळूहळू स्पष्ट होत आहे. अपक्ष म्हणून निवडणूक लढविणारे आणि आदिवासी समाजाचे आवडते नेते आनंदराव गेडाम यांना भाजपच्या उमेदवाराला तगडी टक्कर देण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे काँग्रेसचा उमेदवार शर्यतीतून बाहेर पडेल, असा दावा मतदार करू लागले आहेत.
आनंदराव गेडाम हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत असले तरी त्यांची विचारधारा धर्मनिरपेक्ष आहे. सर्व धर्म समानतेसाठी झटत त्यांनी सेवाकार्य केले आहे. विशेष म्हणजे गेडाम यांनी 2019 मध्ये विधानसभा निवडणूक लढवली होती. प्रचारादरम्यान तो फार दूरवर दिसत नव्हता. तरीही त्यांना 54 हजार मते मिळाली. यावरूनही त्यांच्या लोकप्रियतेचा अंदाज लावता येतो. त्यांनी काँग्रेस पक्षाकडे तिकीट मागितले होते. काँग्रेसने सामाईक सत्तेऐवजी पैशाच्या सत्तेला महत्त्व दिले. त्यामुळे आता रामदास मसरामही काँग्रेसच्या छावणीत आहेत.
सर्वसामान्य कामगार व आदिवासींमधून त्यांची जीवनशैली आणि हायफाय जीवनशैलीबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यावेळी सर्वसामान्यांनी आरमोरीमध्ये परिवर्तनाचा नारा दिला आहे. आरमोरी विकासाच्या नावाखाली खूपच मागासलेली आहे. मोठमोठे प्रकल्प, प्रकल्प सोडा, लोक मूलभूत सुविधांसाठी तळमळत आहेत. भाजपच्या धोरणांमुळे आणि समाजाला तोडण्याच्या कारवायांमुळे लोक हळूहळू आनंदराव गेडाम यांच्याकडे झुकू लागले आहेत. यावेळी गेडाम भाजपला तगडी टक्कर देतील, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. आरमोरी मतदारसंघातील मतदार जागरूक झाला आहे. आमची अमूल्य मते सक्षम उमेदवारांना देण्याची मानसिकता आम्ही विकसित केली आहे. आनंदराव गेडाम यांच्या रूपाने एका चांगल्या पर्यायाचा जनतेसमोर विचार केला जात आहे. 20 नोव्हेंबरला मतदानाच्या दिवसापर्यंत प्रचाराचा हा वेग काय दिशा घेतो, हेही येत्या काही दिवसांत कळेल.
गडचिरोली : लोकसभा असो की विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार गडचिरोलीत कायम हस्तक्षेप करतात. जिल्ह्यातील नेत्यांना डावलून परस्पर निर्णय घेतात. इतके वर्ष प्रामाणिकपणे पक्षात कार्य करूनही आमची कोंडी होत असेल तर वेगळा मार्ग का निवडू नये, असा सवाल उपस्थित करून आरमोरीचे माजी आमदार आनंदराव गेडाम ची यांनी आपण अर्ज मागे घेणार नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे काँग्रेसच्या अडचणीत वाढ झाली आहे.
जिल्ह्यातील तिन्ही विधानसभेत सर्वाधिक बंडखोरी काँग्रेसमध्ये झाली आहे. उमेदवारी न मिळाल्याने इच्छुकांमध्ये अस्वस्थता आहे. यात आरमोरी विधानसभेतून काँग्रेसचे माजी आमदार आनंदराव गेडाम यांनी बंडाचे निशाण कायम ठेवण्याचा निर्णय घेतला असून त्यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवर यांच्यावर टीका केली आहे. याठिकाणी काँग्रेसने माजी आमदार गेडाम यांना डावलून रामदास मसराम यांना संधी दिली आहे. त्यामुळे काँग्रेसकडून इच्छुक असेलेले माजी आमदार आनंदराव गेडाम, वामनराव सावसागडे, डॉ. शिलू चिमुरकर यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. ४ नोव्हेंबर अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. दरम्यान, पक्षाकडून नाराजांची समजूत काढण्याचा प्रयत्न होत आहे. यासंदर्भात माजी आमदार आनंदराव गेडाम यांना विचारणा केली असता त्यांनी विजय वडेट्टीवार यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले, वडेट्टीवार नेहमीच गडचिरोली जिल्ह्यात हस्तक्षेप करतात. जिल्ह्यातील आदिवासी नेत्यांकडे दुर्लक्ष केल्या जाते. आम्ही देखील इतके वर्ष पक्षासाठी काम केले. पण वडेट्टीवारांकडून आमची कायम कोंडी केल्या जाते. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार निवडीत देखील हाच प्रकार झाला. सर्वच दृष्टीने मी पात्र असताना देखील एका नवख्या आणि निष्क्रिय व्यक्तीला संधी देण्यात आली. हे केवळ वडेट्टीवार यांच्या हस्तक्षेपामुळे झाले. अशी टीका करून गेडाम यांनी अपक्ष अर्ज मागे घेणार नाही, असे स्पष्ट केले. गेडाम यांच्या बंडामुळे आरमोरीत काँग्रेसला मत विभाजनाचा फटका बसू शकतो, असे जाणकार सांगतात. त्यामुळे काँग्रेस काय भूमिका घेणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
अहेरी, गडचिरोलीतही आव्हान
जिल्ह्यात केवळ आरमोरीच नव्हे तर अहेरी आणि गडचिरोलीत देखील काँग्रेस समोर बंडखोरांचे आव्हान आहे. गडचिरोलीत विश्वजीत कोवासे, डॉ. सोनल कोवे तर अहेरीत हणमंतू मडावी आणि नीता तलांडी यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. यातून कोवासे, कोवे हे माघार घेऊ शकतात पण मडावी आणि तलांडी ठाम आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवाराला याचा फटका बसू शकतो. बंडखोरांची समजूत काढण्यासाठी काँग्रेसचे काही महत्त्वाचे पदाधिकारी उद्या गडचिरोलीत येणार आहे. त्यांच्या भेटीनंतर चित्र स्पष्ट होणार आहे.
भोजराज नागपुरे मोब. ९४२२८२५५९७
देसाईगंज /- राज्यात सद्यास्थितीत महायुती सरकारच्या प्रचंड भ्रष्टाचाराला वैतागून तसेच महागाई, बेरोजगारी या मुद्द्याला घेऊन असंतोष उफाळून येऊ लागला आहे. भाजपाच्या लोकसभेतील उमेदवारांनी चक्क ४०० पार झाल्यास संविधान बदलण्याची जाहिर व्याख्याने केल्याने एकवटलेल्या बहुजन समाजाने काँग्रेसचे विद्यमान खासदार डॉ. नामदेव किरसान यांना तब्बल दिड लाखाच्या फरकाने निवडून आणले. मात्र काँग्रेसचा खासदार निवडून येताच काँग्रेसीत हवा शिरल्याने कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या तसेच पक्षासाठी कुठलेही योगदान नसलेल्या रामदास मसराम यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यामुळे पक्षासाठी खपलेला एक नाराज गट एकत्र येऊन उमेदवार देणार असल्याचे जवळपास निश्चित झाल्याने बंडखोरीचा मसराम यांना जबर फटका बसणार असून मसराम यांची ही राजकीय आत्महत्या असल्याचे बोलल्या जाऊ लागल्याने राजकीय खळबळ माजली आहे
आरमोरी विधानसभा क्षेत्रा करीता काँग्रेस कडुन रामदास मसराम यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मसराम हे काँग्रेस पक्षाची वाताहत करण्यासाठी वाड्यावरून सोडलेले दलालांच्या माध्यमातून राजकीय स्थिरता मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र त्यांच्या भोवताली असलेल्या सक्रिय दलालांमुळे कट्टर काँग्रेसीत असंतोष उफाळून आला असून मसराम यांना विरोध नसला तरी दलालांनी वारंवार पक्षाच्या प्रामाणिक व सक्रिय पदाधिकारी, कार्यकर्त्यांना डावलण्याचा प्रयत्न केल्याने व दरम्यान जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतिने काढण्यात आलेल्या जनसंवाद परिवर्तन यात्राही हायजॅक करण्याचा प्रयत्न केल्याने अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला होता. केवळ पक्षाची तिकीट मिळावी या उद्देशाने आठ महिण्यापुर्वी काँग्रेस पक्षात प्रवेश करून लोकसभा निवडणुकीत स्थानिक पदाधिकाऱ्यांचे खिसे भरून पक्षात दावेदारीचे वातावरण निर्माण केले. दरम्यान काँग्रेसच्या इतर पदाधिकारी कार्यकत्यांनी पक्ष वाढीसाठी
विविध आंदोलन करून, महायुती सरकारचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणण्यासाठी मेळाव्याचे आयोजन केले. मात्र मसराम अँड होऊ कंपनिने इतरांना डावलून प्रसंगी खोटे व्हिडिओ व्हायरल करून पक्षाच्याच पदाधिकाऱ्यांना आहे. बदनाम करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. तोंडावर दरम्यान जिल्हाध्यक्ष यांनी सर्वांना विश्वासात घेऊन यावर तोडगा काढायला गंभीर पाहिजे होता. मात्र ज्यांच्या सहकायनि जिल्हाध्यक्ष बनलेल्या महेंद्र ब्राम्हणवाडे स्थितीत यांनी त्यांचेच पंख छाटून मसराम यांची तसेच एकतर्फी बाजु घेतल्याने पक्षात त्याचक्षणी दुफळी निर्माण होण्यास सुरुवात झाली होती. पक्षाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी उमेदवार एकोप्याने निवडणुकीला सामोरे जाणे गरजेचे असतांना ब्राम्हणवाडे यांनी जेष्ठ स्वप्न पदाधिकाऱ्यांना डावलून जाहिरातीसाठी कित्येकांना लाखो रुपये खर्च करवून तसेच यामुळे परिवर्तन यात्रेसाठी संभाव्य उमेदवारांकडून वाताहत वसुली करण्यात आल्याने सर्वांना समान येऊ न्यायाने वागवून पैकी एका उमेदवारावर प्रश्न लक्ष केंद्रित करणे आवश्यक होते. मात्र असे
करण्यात न आल्याने मसराम यांना समोर समोर करून इतरांचे पंख छाटले ज्याचा रोष घातलेल्या निवडणुकीत व्यक्त होणार असल्याचे यामुळे स्पष्ट समोर येऊ लागले विशेष म्हणजे ऐन निवडणुकीच्या मसराम यांचा जमिन विक्रीतून आपल्याच नातेवाईकाच्या फसवणूकीची बाब चव्हाट्यावर आल्याने आदिवासी समाजही मसराम यांना झटका देण्याच्या असल्याचे सांगीतले जात आहे. समोरचा उमेदवार तगडा आणि संघटितपणे निवडणुक लढणारा असल्याने ऐन निवडणुकीत असंतोष गट एकवटून आपला उभा करणार असल्याने उभा केलेल्या बैलोबाच्या माध्यमातून मुख्यमंत्री होण्याचे रंगविणाऱ्याला हा चांगलाच झटका असल्याचे बोलल्या जाऊ लागले आहे. पक्षाचा जनाधार असुनही काँग्रेसची होणार असल्याचे यावरून समोर लागल्याने यास जबाबदार कोण? असा आता उपस्थित केल्या जाऊ लागला आहे
गडचिरोली : आझाद समाज पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, आदिवासी विकास परिषद आणि प्रागतिक पक्ष, महाराष्ट्र आघाडीचे अधिकृत उमेदवार चेतन काटेंगे यांनी आज शेकडो कार्यकर्त्यांसह शक्ती प्रदर्शन करीत मंगलवार दिनांक २९ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला.
आझाद समाज पक्षाचे जिल्हा प्रभारी धर्मानंद मेश्राम, जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, कार्याध्यक्ष विनोद मडावी, आरमोरी विधानसभा अध्यक्ष ऋषी सहारे, जिल्हा संघटक हंसराज उराडे, विधानसभा प्रभारी धनराज दामले,तालुका अध्यक्ष आरमोरी ॲड नर्गिस पठाण, आरमोरी तालुका प्रभारी गोवर्धन धोटे, तालुका महासचिव ॲड राज सुखदेवे, शहर अध्यक्ष नागसेन खोब्रागडे, तालुका सचिव सुरेंद्र वासनिक, शहर अध्यक्ष नितीन भोवते, युवा आघाडी तालुका अध्यक्ष आरमोरी शुभम पाटील, मीडिया प्रमुख सतीश दूर्गमवार , तालुका संघटक रोहिदास बोदेले, कार्याध्यक्ष पुरुषोत्तम मैंद, रमेश तुलावी, सोमाजी काटेंगे, रमेश तुलावी, बारशू तुलावी, रेवणाथ मारगाये, देविदास कुमरे, कुरखेडा तालुका अध्यक्ष सावन चीखराम,युवा आघाडी अध्यक्ष रोहित कोडवते, विधानसभा उपाध्यक्ष सोनुभाऊ चौधरी, भूपेंद्र बनसोड, आदिवासी विकास परिषद अध्यक्ष अंकुश कोकोडे, महिला तालुका अध्यक्ष वडसा संगीता मोटघरे, तालुका सचिव करण डोंगरे, महिला आघाडी सचिव शिला सहारे,किशोर कावळे वडसा, तालुका अध्यक्ष वडसा बबन रामटेके, गजानन केलझळकर कुरुड, सचिन गेडाम,
यावेळी आरमोरी विधानसभा मतदारसंघातील शेतकरी कामगार पक्ष, आझाद समाज पक्ष, आदिवासी विकास परिषद आणि प्रागतिक आघाडीचे हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.द्र बनसोड, आदिवासी विकास परिषद अध्यक्ष अंकुश कोकोडे, महिला तालुका अध्यक्ष वडसा संगीता मोटघरे, तालुका सचिव करण डोंगरे, महिला आघाडी सचिव शिला सहारे,किशोर कावळे वडसा, तालुका अध्यक्ष वडसा बबन रामटेके, गजानन केलझळकर कुरुड, सचिन गेडाम,
यावेळी आरमोरी विधानसभा मतदारसंघातील शेतकरी कामगार पक्ष, आझाद समाज पक्ष, आदिवासी विकास परिषद आणि प्रागतिक आघाडीचे हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.
गडचिरोली :- काही दिवसांपासून जिल्ह्यातील सर्वांच्या नजरा आरमोरी विधानसभा क्षेत्राकडे लागलेल्या दिसून येत होत्या. अशातच आता काही वेळापूर्वी काँग्रेसची चौथी यादी जाहीर करण्यात आली आहे. यात १४ उमेदवारांचे नाव पुढे आले आहेत. १४ उमेदवारांमध्ये काँग्रेसच्या वतीने आरमोरी विधानसभा मतदारसंघाकरीता रामदास मसराम यांना तिकीट देण्यात आली आहे. यावेळेस आरमोरी विधानसभा मदारसंघात नवीन चेहरा देण्यात आल्याने चुरशीची लढत पहावयास मिळणार आहे. त्यामुळे 'जूनं की नवं' असा महासंग्राम दिसून येणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे.
काँग्रेसच्या १४ उमेदवारांची यादी
अमळनेर - डॉ. अनिल नाथु शिंदे
उमरेड - संजय नारायणराव मेश्राम
आरमोरी - रामदास मसराम
चंद्रपूर - प्रवीण नानाजी पडवेकर
बल्लारपूर - संतोषसिंग रावत
वरोरा - प्रवीण काकडे
नांदेड उत्तर - अब्दुल सत्तार अब्दुल गफूर
औरंगाबाद पूर्व - लहू शेवाळे
नालासोपारा - संदीप पांडे
अंधेरी पश्चिम - अशोक जाधव
शिवाजीनगर - दत्तात्रेय बहिरत
पुणे छावणी - रमेश बागवे
सोलापूर दक्षिण - दिलीप माने
पंढरपूर - भागीरथ भालके